4 वर्षांचा चिमुकला वर्गखोलीत अडकला अन्… ; नागपूरमध्ये घडला धक्कादायक प्रकार

4 वर्षांचा चिमुकला वर्गखोलीत अडकला अन्… ; नागपूरमध्ये घडला धक्कादायक प्रकार

| Updated on: Feb 20, 2026 | 12:25 PM

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत 4 वर्षीय हिमांशू बागडे रात्रभर एका वर्गखोलीत अडकला. बालवाडीत शिकणारा हिमांशू खेळून दमल्यावर वर्गखोलीत झोपी गेला आणि शिक्षकांनी खोली बंद केली. आई-वडिलांनी शोध घेऊनही तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता खोली उघडल्यावर तो सुखरूप आढळून आला. या काळोख्या खोलीत त्याने दाखवलेले धाडस कौतुकास्पद आहे.

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिचोली (रण) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. 4 वर्षीय हिमांशू बागडे हा बालवाडीत शिकणारा मुलगा रात्रभर शाळेच्या वर्गखोलीत अडकून राहिला. खेळून दमल्यामुळे तो एका बेंचवर झोपी गेला आणि वर्गखोली बंद करण्यात आली.

रात्री उशिरापर्यंत हिमांशू घरी न परतल्याने त्याचे आई-वडील चिंतेत पडले. त्यांनी शाळेच्या परिसरात जाऊन दोनदा शोध घेतला, आवाजही दिला, परंतु हिमांशू झोपेत असल्याने त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता शाळेची वर्गखोली उघडली असता, हिमांशू तिथे सुखरूप आढळून आला. या चार वर्षांच्या मुलाने रात्रभर काळोख्या खोलीत एकट्याने राहून दाखवलेले धाडस सध्या कौतुकाचा विषय ठरले आहे.

Published on: Feb 20, 2026 12:25 PM