Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत…
नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी तीव्र आंदोलन केले. एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसह कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्सवर चढून घोषणाबाजी केली आणि ज्ञानेश कुमार यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
नागपूरमध्ये काँग्रेस पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्सवर चढून तीव्र घोषणाबाजी केली आणि ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात संताप व्यक्त केला. एसआयआर (SIR) प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणीही यावेळी प्रमुख्याने करण्यात आली.
या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्ञानेश कुमार यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. तसेच जुते मारो आंदोलन करत आपला निषेध नोंदवला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना अडवले. नागपूर ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष आणि शहर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर एका विशिष्ट व्यक्तीचे कार्यकर्ते असल्याचा आणि भाजप-आरएसएसच्या बाजूने काम करत असल्याचा आरोप केला. बंगाल आणि बिहारमधील निवडणुकांमध्ये मत चोरी झाल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात संघर्ष सुरू असल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले. नागपूरमधील या आक्रमक आंदोलनाने राजकीय वर्तुळात लक्ष वेधले आहे.
