Nagpur | मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्… वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेकाचं भयनाक कृत्य

| Updated on: Aug 06, 2026 | 4:21 PM

नागपुरात 16 वर्षीय मुलीला बंधक बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 19 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

नागपुरात 16 वर्षीय मुलीला बंधक बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 19 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पीडित मुलीची आरोपीशी काही महिन्यांपूर्वी Instagram वरून ओळख झाली होती. ती 12वी इयत्तेत शिकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस अधिकारी रश्मिता राव यांनी माध्यामंना सदर घटनेची माहिती दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने बनावट ओळख वापरून मुलीशी संपर्क वाढवला. मागील वर्षी तो दोन वेळा नागपुरात आला होता. त्यानंतर भेटण्याच्या बहाण्याने त्याने मुलीला हुडकेश्वर परिसरातील भाड्याच्या घरात बोलावले. तिथे तिला 24 तासांहून अधिक काळ बंधक ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. यावेळी आरोपीने पिडितेवर अत्याचार केल्याचंही सांगितलं जात आहे. त्याने डार्क वेबचा वापर करून कट रचल्याचा संशय आहे.

पोलिसांनी अपार्टमेंटमध्ये प्रवेश केल्यानंतर मुलगी खोलीत सापडली. ती बेड्या असून पलंगाच्या रेलिंगला बांधलेली होती. तिच्या शरीराच्या विविध भागांवर दुखापतींच्या खुणा आढळल्या. पोलिसांनी तिला तातडीने ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली.

आरोपी ठाण्यातील एका डॉक्टरचा मुलगा आणि महाराष्ट्र पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा पुतण्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Published on: Aug 06, 2026 4:21 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us