Jaish E Mohammed : आता नागपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर? जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांकडून रेकी, पोलीस सज्ज

| Updated on: Jan 07, 2022 | 11:05 PM

नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय, हेडगेवार स्मारक यासह अनेक महत्वाची ठिकाणं आहेत. दहशतवाद्यांनी शहरातील महत्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Follow us on

नागपूर : राज्याची उपराजधानी असलेलं नागपूर (Nagpur) आता दहशतवाद्यांच्या (Terrorist) टार्गेटवर असल्याचं दिसून येत आहे. कारण जैश ए मोहम्मद (Jaish E Mohammed) या दहशतवादी संघटनेनं नागपुरातील महत्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे नागपूरमध्ये हायअलर्ट (High Alert) जारी करण्यात आलाय. तसेच नागपूर पोलीसही सतर्क झाले आहे.