Video | धो धो धो पावसात चक्क शाळाच… दोरीच्या सहाय्याने चिमुकल्यांचा रेस्क्यु, धडकी भरवणारा व्हिडीओ समोर

Video | धो धो धो पावसात चक्क शाळाच… दोरीच्या सहाय्याने चिमुकल्यांचा रेस्क्यु, धडकी भरवणारा व्हिडीओ समोर

| Updated on: Jul 28, 2026 | 4:04 PM

नागपुरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने शहरासाठी यलो अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळपासून नागपुरात हलक्या सरी सुरू होत्या. मात्र, काही वेळातच पावसाचा जोर वाढल्याने अनेक सखल भाग जलमय झाले. काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे.

प्रतापनगर येथील सोमलवार शाळेच्या मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शाळा सुरू असतानाच मैदान पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. महत्त्वाचं म्हणजे दोऱ्यांच्या सहाय्याने शाळेतील चिमुकल्यांना बाहेर काढण्यात येत आहे. यावेळी पाकलही शाळेजवळ जमा झाले असून जवळपास शंभर-दोनशे मुलांना शाळेत साचलेल्या पाण्यातून काढलं जात आहे. बाचाव कार्य करण्यासाठी पथक दाखल झाले असून पालकदेखील आले आहेत. यावेळी अनेक पालकांना अश्रु अनावर झाले आहेत.

परिसरात रस्त्याची कामे सुरू असल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक दोऱ्यांच्या आधाराने रस्ता ओलांडताना दिसत आहेत.

हवामान विभागाने आज दिवसभर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवरही झाला आहे. रेडिसन ब्लु उड्डाणपूल परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली असून काही ठिकाणी घरांच्या अंगणातही पाणी शिरले आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Published on: Jul 28, 2026 4:04 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us