नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..

नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..

| Updated on: Aug 02, 2026 | 3:01 PM

नांदेडमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांचे गुरुपौर्णिमेनिमित्त दुधाने पाय धुतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून विरोधकांकडून नाना पटोले यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र, पाय धुणाऱ्या व्यक्तींनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देत टीकेला उत्तर दिले आहे.

भाजपने हिंदू धर्म किंवा गुरुपौर्णिमा कशी असते, याबाबत आम्हाला शिकवू नये, अशी भूमिका अनिल पाटील चिमेगावकर आणि माधवराव पवळे यांनी मांडली. नाना पटोले यांनी पाय धुऊन घेतले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याबाबत बोलताना अनिल पाटील चिमेगावकर आणि माधवराव पवळे म्हणाले, “नाना पटोले यांनी पाय धुऊन घेतले नाही तर नांदेडवरून आम्ही रत्नागिरीला गेलो होतो आणि गुरुपाद्य पूजा केली.”

त्यामुळे व्हायरल झालेल्या व्हिडीओमागील नेमका प्रकार काय होता, यावरून आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या दोघांशी आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी बातचीत केली. त्यांची सविस्तर भूमिका व्हिडीओमधून समोर आली आहे.

Published on: Aug 02, 2026 3:01 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us