‘महाराष्ट्रातील त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा…’, नाना पटोले यांचा सरकारला इशारा

‘महाराष्ट्रातील त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा…’, नाना पटोले यांचा सरकारला इशारा

Harshada Shinkar | Updated on: Sep 18, 2024 | 5:16 PM

अमेरिकेत आरक्षणासंदर्भात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक वक्तव्य केले होते. यावरुन शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार अन् प्रवक्ते संजय गायकवाड हे आक्रमक होत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजपचे नेते आणि खासदार अनिल बोंडे यांचीही जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. 'राहुल गांधी यांची जीभ छाटू नये तर त्याच्या जिभेला चटके द्यायला हवे', असे अनिल बोंडे म्हणाले.

शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय गायकवाड यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याबाबत एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन संजय गायकवाड यांनी संताप व्यक्त करत वादग्रस्त वक्तव्य केलं. “जो राहुल गांधीची जीभ छाटेल त्याला ११ लाखांचे बक्षीस देणार”, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. अशातच पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला इशारा दिला आहे.महाराष्ट्रातील दोन वाचाळविरांच्या विरोधात आणि देशातील जे वाचाळवीर आहेत, या वाचाळविरांच्या विरोधात महाराष्ट्रात काँग्रेसकडून उद्या उग्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. पुढे ते असेही म्हणाले की, महाराष्ट्रातील दोन वाचाळविरांच्या विरोधात सरकारने त्वरीत कारवाई करावी, जर यांच्याविरोधात कारवाई केली नाही तर याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरून लढाई पुढे नेऊ, मात्र राहुल गांधींच्या केसाला कुणी धक्का लावण्याचा विचार करू नये, असा इशाराच नाना पटोले यांनी सरकारला दिला.

Published on: Sep 18, 2024 5:16 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us