महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्…हादरवून टाकणारं प्रकरण समोर!

| Updated on: Aug 08, 2026 | 6:26 PM

नंदुरबार शहरात बालक आणि युवकांशी संबंधित गंभीर प्रकरण समोर आले आहे. कथित लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगच्या आरोपांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चेतन कोळी या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

तपासादरम्यान संशयिताच्या मोबाईलमध्ये सुमारे 200 व्हिडीओ क्लिप आणि 600 छायाचित्रे आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संशयिताने काही बालक आणि युवकांचे व्हिडीओ तयार करून त्याद्वारे त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. त्यानंतर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचेही तपासात समोर येत असल्याचे सांगण्यात आले.

प्राथमिक तपासानुसार, 2022 ते 6 ऑगस्ट 2026 या कालावधीत हा प्रकार सुरू असल्याचा संशय आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून संशयितावर लक्ष ठेवले होते. भोणे फाटा परिसरात संशयास्पद परिस्थितीत आढळल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणात आणखी किती बालक आणि युवक पीडित आहेत, याचा तपास सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती दिली.

Published on: Aug 08, 2026 6:26 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us