VIDEO : Narayan Rane | शिवसेनेकडून आम्हाला आशीर्वाद नको महागात पडेल, नारायण राणेचा टोला

VIDEO : Narayan Rane | शिवसेनेकडून आम्हाला आशीर्वाद नको महागात पडेल, नारायण राणेचा टोला

| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 2:10 PM

ओबीसींच्या इम्पेरिकल डेटा केंद्राने पुरवावा यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यासाठी छगन भुजबळ आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावरुन नारायण राणे यांनी छगन भुजबळांवर टिका केली आहे. .

मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) इम्पेरिकल डाटावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. हे भुजबळ एकदा जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा आहे. ते परत डोकं वर काढत आहेत, असा बोचरा वार नारायण राणे यांनी केला. ओबीसींच्या इम्पेरिकल डेटा केंद्राने पुरवावा यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यासाठी छगन भुजबळ आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावरुन नारायण राणे यांनी छगन भुजबळांवर टिका केली आहे. .