पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! शरद पवारांबाबत काय म्हणाले नरेंद्र मोदी? अमोल कोल्हेंनी सगळंच सांगितलं

पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! शरद पवारांबाबत काय म्हणाले नरेंद्र मोदी? अमोल कोल्हेंनी सगळंच सांगितलं

| Updated on: Aug 10, 2026 | 2:05 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 8 खासदारांनी आज (१० ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 8 खासदारांनी आज (१० ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह झालेल्या या भेटीनंतर खासदार अमोल कोल्हे यांनी बैठकीबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधानांनी शरद पवारांच्या एनर्जीचं कौतुक केल्याचं सांगितलं.

संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली. राष्ट्रवादीच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 15 मिनिटांहून अधिक वेळ चर्चा केली. भेटीसाठी सर्व खासदार पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारणा केली. त्यानंतर शरद पवार यांच्या एनर्जीचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे, ते कॅन्सर सारख्या भयाण आजाराशी झुंज देत असून राजकारणातही सक्रिय आहेत. अशा शब्दात मोदींनी कौतुक केलं.

बैठकीदरम्यान खासदारांनी आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्न पंतप्रधान मोदी यांच्यासमोर मांडले. मतदारसंघातील समस्या, प्रलंबित कामे आणि नागरिकांशी संबंधित मुद्द्यांवर खासदारांनी चर्चा केली. त्यामुळे ही भेट केवळ राजकीय चर्चेपुरती मर्यादित न राहता मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठीही महत्त्वाची ठरल्याचे दिसून आले.

Published on: Aug 10, 2026 1:51 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us