Devendra Fadnavis On Ashok Kharat | महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती पाहून बसेल धक्का
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली आहे. अशोक खरातवर अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचे आरोप आहेत. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती विधानसभेत सादर केली.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली आहे. अशोक खरातवर अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचे आरोप आहेत. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती विधानसभेत सादर केली. त्यांनी सांगितले की, आरोपीच्या संपत्तीचा सखोल आढावा घेतला आहे. मिरगाव, पाथर्डी, नाशिक, पुणे, पनवेल अशा ठिकाणी त्याचे फार्महाऊस, प्लॉट, फ्लॅट्स आणि बंगले आहेत. त्याच्याकडे सोन्याचे दागिने आणि बँक खात्यांतील मोठ्या रकमेची गुंतवणूकही आहे. या संपत्तीचे बाजारमूल्य सुमारे ४० कोटी ८७ लाख आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, आरोपीच्या सीएची माहिती गोळा करण्यात आली असून, त्याने अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, यूएई, आफ्रिका आणि इतर देशांमध्ये प्रवास केला आहे. आरोपीच्या नातेवाईकांवर असलेल्या संपत्तीची चौकशीही सुरू आहे. तसेच, आयकर विभाग आणि एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहार केला का, शिवनिका संस्थान आणि इतर ट्रस्टच्या कार्यकारी मंडळाचीही सखोल चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असून, आरोपीच्या संपत्ती, आर्थिक व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या माहितीचा तपास सखोलपणे केला जात आहे.
