Nashik Godman Ashok Kharat: कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील ?

Nashik Godman Ashok Kharat: कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील ?

| Updated on: Mar 21, 2026 | 1:17 PM

भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या भोंदूबाबाकडे महाराष्ट्रातील राजकारणी सल्ला मागण्यासाठी येत असत, असे उघडकीस आले आहे. आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात नवाच खुलासा केला आहे.

एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना एकदा शिर्डीला आले होते. त्यावेळी त्यांनी खरात याच्या मंदिरात जायचे असल्याचे सांगितले. त्यावेळी मी पालक मंत्री या नात्याने त्यांच्या स्वागताला त्यांच्या सोबत होतो. एकनाथ शिंदे पूजा करायला आत गेले आणि मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बाहेर थांबलो होतो असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात म्हटले आहे. भोंदूबाबा अशोक खरात याला अटक झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महायुतीचे नऊ मंत्री भोंदूबाबा अशोक खरात याच्याकडे जात येत होते असे उघड झाले आहे. भोंदूबाबाने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे देखील उघडकीस आले आहे. या प्रकरणात त्याचा पी.ए. नीरज जाधव याच्याकडून पोलिसांनी ५८ आक्षेपार्ह सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरुन राजीनामा द्यावा लागला आहे.

 

Published on: Mar 21, 2026 01:16 PM
Follow Us