tv9 Marathi Special Report | तर खरात फाईलमुळे महाराष्ट्रातील सरकार कोसळू शकतं, संजय राऊत यांचा मोठा दावा
नाशिकमध्ये बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांचे पाद्य पूजन केल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
नाशिकमध्ये बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांचे पाद्य पूजन केल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून गंभीर आरोप केले आहेत. खरात याच्याकडून तब्बल 58 व्हिडिओ जप्त करण्यात आल्याचा दावा करत राऊत यांनी हे प्रकरण “महाराष्ट्राचे एप्सटिन प्रकरण” असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओंमध्ये अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता असल्याचा दावा करत राऊत म्हणाले की, यात काही भाजप नेत्यांचा समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही. जर हे महाराष्ट्राचं एप्सटिन प्रकरण असून, ज्यात भाजपचे नेते अडकले ते सर्व बाहेर आलं तर सरकार कोसळू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
