मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्… पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ

मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्… पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ

| Updated on: Aug 16, 2026 | 4:24 PM

 नवी मुंबईत अलीकडेच मोठी घटना घडली आहे.  नवी मुंबईमधील एका पीडित व्यक्तीने 112 या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला. या नंबवर कॉल केल्याने पोलिसांनीच मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पीडित व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, त्याला मारहाण झाली होती आणि मदतीसाठी त्याने 112 या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधला होता. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मदत करण्याऐवजी त्यालाच मारहाण केल्याचा दावा त्याने केला आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या संवादानुसार, पीडित व्यक्ती पोलिसांना सांगत आहे, “मेरेको मारा सर, इसीलिये फोन लगाया हूं” (मला मारले, म्हणून मी फोन केला). यावर कथितरित्या पोलीस त्याला “तू 112 वर क्यूं कॉल..?” (तू 112 वर का कॉल केलास?) असे विचारताना दिसत आहेत, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडल्याचे दिसते. या घटनेने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी असलेल्या 112 क्रमांकावर कॉल केल्यास अशी वागणूक मिळत असेल, तर सुरक्षिततेची भावना कशी राहील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ही घटना नवी मुंबईतील असल्याचे सांगितले जात आहे आणि या व्हायरल व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Published on: Aug 16, 2026 4:24 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us