manikrao kokate Video : माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा, धाकधूक कायम

manikrao kokate Video : माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा, धाकधूक कायम

| Updated on: Feb 24, 2025 | 6:04 PM

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे समोर आले आहे. मात्र अद्याप धाकधूक कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांच्यावर 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याच्या आरोप करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेनंतर माणिकराव कोकाटे […]

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे समोर आले आहे. मात्र अद्याप धाकधूक कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांच्यावर 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याच्या आरोप करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेनंतर माणिकराव कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयाचे दार ठोठावले होते. दरम्यान, आता नाशिक सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा दिला आहे. नाशिकच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. न्यायमूर्ती नितीन जीवने यांनी याबद्दलचा निकाल दिला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई वकील आशुतोष राठोड यांनी याबद्दल घेतलेला आक्षेपही फेटाळण्यात आला आहे. पण माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवर टांगती तलवार अद्यापही कायम आहे.

प्रकरण नेमकं काय?

1995 मध्ये महाडच्या स्कीममध्ये मुख्यमंत्री 10% कोटा योजनेतून घर मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र दिल्याचा ठपका कोकाटेंवर आहे. स्वतःचं घर नसल्याचं आणि उत्पन्न कमी असल्याचं सांगून दोन घरं त्यांनी पदरात पाडून घेतली आहेत. इतर लाभार्थ्यांना मिळालेली दोन घरं सुद्धा स्वतःच्या नावावर करून घेतली. शिवाय घरं नावावर झाल्यानंतर अनधिकृत बांधकाम केल्याचा सुद्धा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी कोकाटे बंधूंसह चौघांविरोधात तक्रार दिली होती. तर 1997 मध्ये तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांच्या फिर्यादीनंतर कोकाटे बंधूंसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 27 वर्ष नाशिकच्या जिल्हा न्यायालयात 10 साक्षीदार तपासण्यात आले अखेर कोर्टात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना दोषी ठरवण्यात आलं. माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनाही प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड सुनावण्यात आला. तसेच महाडचे हे फ्लॅट्स परत करण्याचे ही आदेश देण्यात आले.

Published on: Feb 24, 2025 06:03 PM
Follow Us