मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; रुपाली चाकणकरांच्या जागी या नावाची चर्चा, राजकारणात मोठं घडणार?

मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; रुपाली चाकणकरांच्या जागी या नावाची चर्चा, राजकारणात मोठं घडणार?

| Updated on: Jun 16, 2026 | 12:01 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक महत्त्वाच्या रिक्त पदांवर या आठवड्यात नवीन नियुक्त्या होण्याची शक्यता आहे. पक्ष संघटनेत मोठे बदल करण्याच्या हालचालींना वेग आला असून काल रात्री मुंबईतील देवगिरी निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक महत्त्वाच्या रिक्त पदांवर या आठवड्यात नवीन नियुक्त्या होण्याची शक्यता आहे. पक्ष संघटनेत मोठे बदल करण्याच्या हालचालींना वेग आला असून काल रात्री मुंबईतील देवगिरी निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पार्थ पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते.

या बैठकीत महिला प्रदेशाध्यक्ष, युवक प्रदेशाध्यक्ष, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष आणि युवती प्रदेशाध्यक्ष या पदांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पक्षातील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. आधी रुपाली चाकणकरांकडे असलेलं महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी वैशाली नागवडे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. तर युवक प्रदेशाध्यक्ष पदासाठी निखिल ठाकरे यांचे नाव चर्चेत आहे. विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पदासाठी आकाश झांबरे पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या नियुक्त्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Published on: Jun 16, 2026 11:57 AM
Follow Us