Devendra Fadnavis on NCP Merger | अगोदर दिल्लीत बैठक, आता राष्ट्रवादीच्या विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य, म्हणाले तो निर्णय…

Devendra Fadnavis on NCP Merger | अगोदर दिल्लीत बैठक, आता राष्ट्रवादीच्या विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य, म्हणाले तो निर्णय…

| Updated on: Feb 10, 2026 | 3:13 PM

पत्रकारांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, "विलीनीकरणाचे जे विषय आहेत, ते राष्ट्रवादी पक्षाचे विषय आहेत. त्यावर मी बोलणे योग्य ठरणार नाही." यावरून असे दिसून येते की, विलिनीकरणाच्या प्रक्रियेत अधिकृत निर्णय घेणारी बाजू पक्षाच्या नेतृत्वाकडे आहे, आणि बाहेरून यावर काहीही निश्चितता सांगणे शक्य नाही.

राज्याचे राजकारण सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर लक्ष केंद्रीत झाले आहे. या विलिनीकरणाच्या प्रक्रियेशी संबंधित अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत, त्यामुळे कार्यकर्ते, नेते यांमध्ये सतत चर्चा सुरू आहे. सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे की, या विलिनीकरणावर अंतिम स्पष्टता कधी मिळणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, या विलिनीकरणासंदर्भात दिल्लीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात सविस्तर चर्चा झाली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे. चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातील समीकरण, विलिनीकरणाची प्रक्रिया, यासंदर्भातील मुद्द्यांवर भर देण्यात आला, असे सुत्रांकडून सांगण्यात आले.

या चर्चेबाबत पत्रकारांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “विलीनीकरणाचे जे विषय आहेत, ते राष्ट्रवादी पक्षाचे विषय आहेत. त्यावर मी बोलणे योग्य ठरणार नाही.” यावरून असे दिसून येते की, विलिनीकरणाच्या प्रक्रियेत अधिकृत निर्णय घेणारी बाजू पक्षाच्या नेतृत्वाकडे आहे, आणि बाहेरून यावर काहीही निश्चितता सांगणे शक्य नाही.

Published on: Feb 10, 2026 03:11 PM