एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं विलीनीकरण… नेमकं काय घडतंय?

एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं विलीनीकरण… नेमकं काय घडतंय?

| Updated on: Jun 30, 2026 | 11:32 AM

राज्यातील फुटीच्या राजकारणामुळे सध्या अनेक पक्षांमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अंतर्गत घडामोडींना वेग आल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाच्या भविष्यासंदर्भात आमदारांमध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

सूत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसला पक्ष विलिनीकरणाचा प्रस्ताव देण्यात आला होता. विरोधी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी हा प्रस्ताव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. सुरुवातीला पक्षातील अनेक नेते या प्रस्तावाबाबत सकारात्मक असल्याचे बोलले जात होते. मात्र, गेल्या 20 दिवसांत आमदारांच्या मतांमध्ये बदल झाल्याचे दिसून आल्याच्या चर्चा आहेत.

काही आमदार काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या बाजूने आहेत, तर काही आमदार थेट भाजपसोबत जाण्याचा विचार मांडत आहेत. मतदारसंघातील विकासकामे रखडत असल्यामुळे अडचणी वाढत असल्याचे काही आमदारांचे मते असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.

Published on: Jun 30, 2026 11:26 AM
Follow Us