शाईफेक प्रकरणानंत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, विकास लवांडे यांचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक

शाईफेक प्रकरणानंत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, विकास लवांडे यांचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक

| Updated on: May 09, 2026 | 3:54 PM

आळंदीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. वारकरी संप्रदायातील घुसखोरीच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण आधीच तापलेले असताना या घटनेमुळे राजकीय आणि धार्मिक वर्तुळात खळबळ माजली आहे. हवेली तालुक्यातील म्हातोबाची आळंदी येथे आज सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

आळंदीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. वारकरी संप्रदायातील घुसखोरीच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण आधीच तापलेले असताना या घटनेमुळे राजकीय आणि धार्मिक वर्तुळात खळबळ माजली आहे. हवेली तालुक्यातील म्हातोबाची आळंदी येथे आज सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, हभप संग्राम भंडारे यांनी आपल्या समर्थकांसह विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकली. वारकरी संप्रदायातील साधुसंत आणि गुरुवर्यांविरोधात लवांडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संताप व्यक्त करत ही कृती केल्याचा दावा भंडारे यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात “मनुवादी आणि कट्टर हिंदुत्ववादी घुसखोर शिरले आहेत” असा आरोप केला होता. तसेच काही कीर्तनकारांवरही गंभीर आरोप करत त्यांनी घुसखोरी करणाऱ्यांची यादी जाहीर केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर वारकरी संप्रदायासह विविध धार्मिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.
शाईफेक प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून लवांडे यांच्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, संग्राम भंडारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारवाईच्या मागणीसाठी विकास लवांडे यांनी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलनही केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Published on: May 09, 2026 03:54 PM
Follow Us