काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR… पुन्हा प्रकरण पेटलं

काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR… पुन्हा प्रकरण पेटलं

| Updated on: Jul 29, 2026 | 12:23 PM

नीट पेपरफुटी प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. दिल्लीतील जंतरमंतर येथे यापूर्वी आंदोलन करणाऱ्या सीजेपी कॉक्रोज जनता पार्टीने सरकारला पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलनादरम्यान सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नसल्याचा पक्षाचा आरोप आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणी सीजेपी कॉक्रोज जनता पार्टीने दिल्लीतील जंतरमंतरवर मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनात विविध मागण्या सरकारसमोर मांडण्यात आल्या होत्या. त्यावेळी पक्षाने सरकारकडून सर्व मागण्या मान्य झाल्याचा दावा केला होता.

मात्र आता पक्षाने पुन्हा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थावरील गुन्हे मागे घेण्याबाबत दिलेल्या आश्वासनांची योग्य अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करत पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनंतर सरकारने एफआयआर मागे घेण्याचे आणि शांततापूर्ण आंदोलनातील विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जाणार नाही, असे आश्वासन दिल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. मात्र या आश्वासनांचे पालन होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

याच आश्वासनांच्या आधारे सीजेपी कॉक्रोज जनता पार्टीने देशव्यापी आंदोलन मागे घेतले होते. आता परिस्थितीत अपेक्षित बदल न झाल्याने पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा पक्षाने दिल्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 29, 2026 12:23 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us