नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महाप्रलय आलाय आणि भयावह दृश्य ही समोर आलीय. पूरस्थितीमुळे 95 जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती सध्या समोर येतेय. 41 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर 100 पेक्षा जास्त भारतीय बेपत्ता आहेत. तिबेटमधून सुरू झालेल्या पुरामध्ये तिबेटमधलं पाच मजली इमिग्रेशन सेंटर क्षणार्धात नाहीसं झालं. जीव वाचवण्यासाठी नागरिक सैरावैरा पळत सुटले. पण पाण्याचा वेग इतका […]
नेपाळमध्ये महाप्रलय आलाय आणि भयावह दृश्य ही समोर आलीय. पूरस्थितीमुळे 95 जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती सध्या समोर येतेय. 41 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर 100 पेक्षा जास्त भारतीय बेपत्ता आहेत. तिबेटमधून सुरू झालेल्या पुरामध्ये तिबेटमधलं पाच मजली इमिग्रेशन सेंटर क्षणार्धात नाहीसं झालं. जीव वाचवण्यासाठी नागरिक सैरावैरा पळत सुटले. पण पाण्याचा वेग इतका होता की नागरिकांना जीव वाचवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. पुराची सुरुवात याच भागातून झाली. तिबेटमधल्या याच इमिग्रेशन सेंटरमधून लोक कैलास मानसरोवरावर यात्रेला जातात. मानसरोवर यात्रेसाठी गेलेले 400 नागरिक बेपत्ता आहेत. यात 93 नेपाळी नागरिक तर इतर बहुतांश भारतीय नागरिक असण्याची शक्यता आहे. भूकंप झाल्यापासून अवघ्या काही मिनिटात हे इमिग्रेशन सेंटर पाण्याच्या प्रवाहात नष्ट झालं. नेपाळमधल्या महाप्रलयामुळे नेपाळमधला मोठा पूल वाहून गेला. पुराचं पाणी नदीकाठच्या घरांमध्ये आणि गावांमध्ये शिरलं. या प्रलयात अनेक पूल वाहून गेले. वाहून गेलेले पूल दुसऱ्या पुलावर जाऊन आदळले. डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या प्रचंड मोठ्या प्रवाहात घरं आणि गाड्या पालापाचोळ्यासारख्या वाहून गेल्या. पाण्याचा वेग इतका जबरदस्त होता की काही घरं आणि गाड्यांचे अक्षरशः तुकडे झाले. पाण्याच्या महाकाय लोंढ्यामुळे नेपाळमधल्या हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट वाहून गेला. हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्टच्या जवळ काम करणारे काही कर्मचारी आणि मशीन सही वाहून गेले. डोंगरावरून वेगाने वाहत येणाऱ्या पाण्यापासून जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा पळत सुटले. अनेकांनी डोंगराच्या उंच भागांवर आसरा घेतला. दरीतून वाहणाऱ्या पाण्याच्या लाटा जवळपास 50 मीटर पेक्षा उंच उसळत होत्या. पाण्यासोबत प्रचंड मोठे दगडही वाहून गेले. या पुराच्या पाण्यातून जीव वाचवण्यासाठी भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रक चालकाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरनं काही स्थानिकांना रेस्क्यू केलंय. घरावर आसरा घेतलेल्या नागरिकांना रेस्क्यू करण्यात आलंय. तिबेटमध्ये 4.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यानं हिमस्खलन झालं. काही तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मते, या पुरात तिबेटमधील ग्लेशियर लेक फुटला असावा. ग्लेशियरवरून बर्फ आणि खडकांचा प्रचंड ढीग कोसळून तो नदीत मिसळल्यामुळे हा महाप्रलय आला असावा. तिबेटमधून पाण्याचा प्रचंड मोठा लोट आल्यानं नेपाळमध्ये विध्वंस झालाय. अनेक गावं, घरं, रस्ते, पूल, हायड्रोपॉवर प्रकल्प वाहून गेले. यात किमान 1 हजाराहून जास्त लोक बेपत्ता आहेत. नेपाळ तिबेट सीमेवरच्या चौक्यांवरचे काही जवान आणि पोलीसही वाहून गेले. हेलिपॅडही पुरानं गिळंकृत केल्यानं बचाव कार्यात अडथळे येत आहेत. नेपाळमधल्या वीज पुरवठ्यावरही याचा मोठा परिणाम झालाय. नेपाळमधल्या या महापुराचा फटका बिहारलाही बसण्याची शक्यता आहे. नेपाळमधील भोटे कोशी आणि त्रिशूली नदीतील पूर खाली वाहत गंडक नदीमध्ये जातो. गंडक नदी बिहारमध्ये प्रवेश करते. त्यामुळे बिहार सरकारने हाय अलर्ट जारी केलाय. बिहारच्या गंडक नदीत सुमारे 3 मीटर उंच पाण्याच्या लाटा येऊ शकतात असा अंदाज आहे. बिहारमधल्या सात जिल्ह्यांना प्रशासनानं अलर्ट दिलाय. NDRF आणि SDRF च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांना फोन करून मदतीचा आश्वासन दिलंय. तर सीएम कार्यालयाकडून ट्विट करण्यात आलंय. नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात येत आहेत. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात 24 तास हा कक्ष कार्यरत आहे. मदतीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईन 1070 टोल फ्री क्रमांक आहे आणि नियंत्रण कक्षासाठी +919321587143 हा नंबर जारी करण्यात आलेला आहे.
