Goregaon Nesco Centre | गोरेगाव ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट: प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचीही पार्टीला हजेरी

Goregaon Nesco Centre | गोरेगाव ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट: प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचीही पार्टीला हजेरी

| Updated on: Apr 15, 2026 | 2:37 PM

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को (NESCO) येथे झालेल्या एका कॉन्सर्टने ड्रग्स पार्टीचे स्वरूप घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. या प्रकरणात आता दोन महत्त्वाचे आणि धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को (NESCO) येथे झालेल्या एका कॉन्सर्टने ड्रग्स पार्टीचे स्वरूप घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
या प्रकरणात आता दोन महत्त्वाचे आणि धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पहिली बाब म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कार्यक्रमाला पूर्ण परवानगी दिली होती. संबंधित कंपनीकडे रात्री 1:30 वाजेपर्यंत मद्यसेवा देण्याचा अधिकृत परवाना असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र, कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू असताना मद्याबरोबरच ड्रग्सचेही मोठ्या प्रमाणात सेवन झाल्याचा आरोप होत आहे. तसेच पोलिसांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.
दुसरी धक्कादायक बाब म्हणजे प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरी (Orry) या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ऑरीवर याआधीही ड्रग्स सेवनाचे आरोप झाले असून मुंबई पोलिसांनी त्याची चौकशीही केल्याची माहिती आहे. सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तो कॉन्सर्टमध्ये उपस्थित असल्याचे आणि नाचताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या घटनेत ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे दोन तरुण-तरुणींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, दोघांनी पार्टीत जाण्यापूर्वी एक-एक कॅप्सूल घेतली होती आणि नंतर आणखी एक कॅप्सूल घेतल्याने ओव्हरडोस झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, बचावलेल्या एका तरुणीला उलट्या झाल्याने तिचा जीव वाचला असावा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून परवानगी प्रक्रिया, सुरक्षा व्यवस्थापन आणि ड्रग्स वापर यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Published on: Apr 15, 2026 02:37 PM
Follow Us