Kasara Ghat Traffic Block : मुंबई-नाशिक महामार्गावरून तुम्ही प्रवास करतात? पुढील 6 दिवस कसारा घाट राहणार बंद, कारण…

Kasara Ghat Traffic Block : मुंबई-नाशिक महामार्गावरून तुम्ही प्रवास करतात? पुढील 6 दिवस कसारा घाट राहणार बंद, कारण…

| Updated on: Feb 24, 2025 | 2:53 PM

मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाट सहा दिवस बंद राहणार आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट रस्ते दुरुस्तीसाठी 24 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च ते 6 मार्च या कालावधीत सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाट सहा दिवस बंद राहणार आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट रस्ते दुरुस्तीसाठी 24 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च ते 6 मार्च या कालावधीत सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने वाहतूक नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार असून अवजड वाहनांना पूर्ण बंदी असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम दोन टप्प्यात पुढील 6 दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत या वेळेत हा ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. सोमवार, 24 फेब्रुवारी ते गुरुवार, 27 फेब्रुवारी 2025 या कालावधीत तसेच 3 मार्च ते 6 मार्च या दरम्यान जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्ती आणि पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, कसारा घाटातील रस्ते दुरुस्ती आणि त्यामुळे वळविण्यात येणारी मार्ग लक्षात घेता मुंबई-नाशिक- शिर्डी प्रवास करणाऱ्यांनी या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी कसारा पोलीस, महामार्ग पोलीस घोटी केंद्र, महामार्ग पोलीस शहापूर केंद्र, आपत्ती व्यवस्थापन टीम नवीन कसारा घाटात कार्यरत असणार आहे.

Published on: Feb 24, 2025 02:53 PM