मी जबाबदारी घेतो म्हणत चक्क… ओमराजे निंबाळकरांना दिल्लीला नेणारा बडा मंत्री?

मी जबाबदारी घेतो म्हणत चक्क… ओमराजे निंबाळकरांना दिल्लीला नेणारा बडा मंत्री?

| Updated on: Jun 17, 2026 | 1:11 PM

शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार फुटणार असल्याच्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या बंडखोरी प्रकरणात सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. त्यांना दिल्ला नेण्याची जबाबादारी एका बड्या मंत्र्याने घेतल्याचं समोर आलं आहे.

शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार फुटणार असल्याच्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या बंडखोरी प्रकरणात सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. त्यांना दिल्ला नेण्याची जबाबादारी एका बड्या मंत्र्याने घेतल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या बंडखोरी धाराशिवकरांचाही पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे.

ठाकरेंचे निष्ठावंत नेते ओमराजे निंबाळकर यांच्याशी चर्चेची आणि दिल्लीला नेण्याची जाबाबदारी परिवहन मंत्री प्रतापसरनाईक यांनी घेतल्याच्या चर्चा आहेत. महत्त्वाचीबाब म्हणजे ते पालकमंत्री असल्याने त्याचा संपर्क ओमराजेंशी आधीपासूनच होत होता. त्यामुळे ते सकाळीच ओमराजेंना घेऊन दिल्लीला पोहोचले, असं सांगितलं जात आहे.

या पार्श्वभूमीवर tv9 मराठीच्या प्रतिनिधींनी धाराशिव येथील लोकांशी संवाद साधला. या संवादानंतर नागरिकांचा तसेच कार्यकर्त्यांचा ओमराजेंना पाठिंबा आहे असं दिसून आलं.

Published on: Jun 17, 2026 12:36 PM
Follow Us