Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!

Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!

| Updated on: Jun 20, 2026 | 4:43 PM

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केल्यानंतर राज्यभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. तब्बल 20 वर्षांपासून न्यायासाठी लढा देणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे.

निकाल जाहीर होण्यापूर्वी ओमराजे निंबाळकर यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हटले होते. मात्र, न्यायालयाने पुराव्यांच्या अभावामुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करत निकाल दिला. निकालानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना या निर्णयाविरोधात पुढील कायदेशीर लढा सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.

याचवेळी ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेबाबतही चर्चा सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा बंडखोर खासदारांमध्ये त्यांचे नाव चर्चेत असून, त्यांनी अद्याप अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मात्र, याबाबत प्रतिक्रिया देताना ओमराजे निंबाळकर यांनी मतदारसंघातील कार्यकर्ते आणि समर्थकांशी चर्चा केल्यानंतरच पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. “माझी राजकीय भूमिका काहीही असली तरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मी यापूर्वीही काही बोललो नाही आणि भविष्यातही बोलणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या त्यांच्या पुढील निर्णयाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, त्यांची भूमिका बंडखोर खासदारांच्या पुढील राजकीय भवितव्यावरही परिणाम करू शकते, अशी चर्चा सुरू आहे.

Published on: Jun 20, 2026 4:43 PM
Follow Us