मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोमवारी ‘मातोश्री’वर येऊन आपली भूमिका मांडणार असल्याचा निरोप दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करणार आहेत. तसेच आपल्या पुढील राजकीय निर्णयामागील भूमिका आणि भूमिका स्पष्ट करण्याची तयारी त्यांनी दर्शविल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, रविवारी पुण्यात ठाकरे गटाचे नेते कैलास पाटील आणि खासदार अरविंद सावंत यांचे निकटवर्तीय नेते वरुण सरदेसाई यांनी ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत सध्याच्या राजकीय घडामोडी, खासदारांच्या बंडखोरीचा मुद्दा आणि ओमराजे यांच्या पुढील भूमिकेबाबत चर्चा झाल्याचे समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार, मातोश्रीकडून संदेश घेऊन कैलास पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांच्याशी संवाद साधला. या चर्चेनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून, ओमराजे निंबाळकर यांचा अंतिम निर्णय काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यांच्या पुढील निर्णयामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.