Harshwardhan Sapkal | कांदा मोर्चात हर्षवर्धन सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य! नेमकं काय म्हणाले सपकाळ?

Harshwardhan Sapkal | कांदा मोर्चात हर्षवर्धन सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य! नेमकं काय म्हणाले सपकाळ?

| Updated on: May 26, 2026 | 4:35 PM

नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने हमीभावाच्या मागणीसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला. कांद्याला किमान 3000 रुपये हमीभाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. गेल्या वर्षीच्या गारपीट आणि नैसर्गिक संकटांमुळे आधीच मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता कांदा आणि इतर पिकांना मिळणाऱ्या कमी दरांचा फटका बसत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

या आंदोलनात महाविकास आघाडीतील अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “सरकार तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे,” असं ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा खरेदीबाबत दिलेल्या आश्वासनांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
दरम्यान, भाषणादरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारवर टीका करताना वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडून या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हं आहेत.
आंदोलनकर्त्यांनी कांदा खरेदी प्रक्रिया एपीएमसीमार्फतच व्हावी, तसेच शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, कांद्याच्या घसरत्या दरांमुळे राज्यातील शेतकरी वर्गात मोठी नाराजी पसरली असून सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.

Published on: May 26, 2026 4:35 PM
Follow Us