अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच… कोर्टात नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादाची सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादाची सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. 2023 मध्ये आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना मानत पक्ष आणि चिन्ह दिले होते. या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
सिब्बल यांनी आयोगाने विधिमंडळातील संख्येच्या आधारावर पक्ष आणि चिन्ह दिल्याचा मुद्दा मांडला. तसेच, “दुसरा गट तयार होणं याचा अर्थ पक्षात फूट पडली असा होत नाही,” असा युक्तीवाद त्यांनी केला. कपिल सिब्बल यांनी लेखी निवेदनाची प्रत सादर केली. यामध्ये त्यांनी चार मुद्दे मांडले.
2018 च्या घटनेतील बदल असंवैधानिक ठरवले जात असतील, तर त्याच घटनेनुसार एकनाथ शिंदे यांची निवड संवैधानिक कशी, असा सवालही सिब्बल यांनी उपस्थित केला. त्यांनी समाजवादी पार्टीतील फुटीचा दाखला देत विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा असल्याचे सांगितले. दहाव्या परिशिष्टाचाही त्यांनी उल्लेख केला.
