Pahalgam Attack Updates : पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक, सर्व पक्षीय बैठकीत काय झालं?

Pahalgam Attack Updates : पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक, सर्व पक्षीय बैठकीत काय झालं?

| Updated on: Apr 24, 2025 | 11:10 PM

All Party Meeting In Delhi About Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्याबाबत आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारकडून महत्वाची कबुली देण्यात आली आहे.

पहलगाम हल्ल्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत यंत्रणेत चूक झाली हे केंद्र सरकारने मान्य केलं आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या संदर्भात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात परतलेल्या अनेक पर्यटकांनी घटनास्थळी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर रिजिजू यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांनी केलेलं हे विधान अत्यंत महत्वाचं मानलं जातं आहे.

मंगळवारी झालेल्या पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटकांना मारण्यात आलं आहे. या घटनेनंतर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात आज सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलेली होती. या बैठकीत केंद्र सरकारकडून चूक झाल्याची कबुली देण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. हल्ला झाला त्या बैसरन खोऱ्यात एकही सुरक्षा रक्षक नसल्याचं पर्यटकांनी म्हंटलं होतं. याच संदर्भात बैठकीत राहुल गांधी यांनी घटना स्थळी सुरक्षा व्यवस्था का नव्हती असा सवाल उपस्थित केला. ऐरवी तो भाग अमरनाथ यात्रे दरम्यान खुला केला जातो. पण यंदा तो स्पॉट स्थानिक पर्यटन आयोजकांकडून न कळवता खुला केला गेला. याची स्थानिक व्यवस्थेला कल्पना नव्हती. म्हणून सुरक्षा तैनातीच्या सूचना नव्हत्या. त्याठिकाणी दर वर्षी जूनमध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाते, असं उत्तर त्यावर केंद्र सरकारकडून देण्यात आलं. तसंच सुरक्षा यंत्रणेत चूक झाल्याचं देखील केंद्र सरकारकडून मान्य करण्यात आलं आहे.

Published on: Apr 24, 2025 11:10 PM