Ashadhi Wari 2025 : वारीला गालबोट, डोळ्यात मिरचीपूड अन् कोयत्याचा धाक, वारीतील अल्पवयीन मुलीसोबत नको ते घडलं

Ashadhi Wari 2025 : वारीला गालबोट, डोळ्यात मिरचीपूड अन् कोयत्याचा धाक, वारीतील अल्पवयीन मुलीसोबत नको ते घडलं

| Updated on: Jul 02, 2025 | 8:52 AM

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. डोळ्यामध्ये मिरचीपूड टाकत कोयत्याचा धाक दाखवत अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पुणे सोलापूर रोडवर पालखी मार्गावर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून वारीला जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला. दौंड तालुक्यातल्या चिंचोली गावात पहाटे चहा घेण्यासाठी एक कुटुंब थांबलं होतं. बाईकवरून जाणाऱ्या दोन बाईकस्वारांनी कुटुंबाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. कोयत्याचा धाक दाखवला आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या घटनेतील आरोपी अद्यापही फरार आहे. या घटनेनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातो आहे. दौंड पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि संशयित आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचा दारारा आणि वचन राहिला नसल्याचं म्हणत अनिल परब यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तर आरोपींना अटक करून केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केली आहे.

Published on: Jul 02, 2025 08:51 AM