VIDEO | विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या भाविकांसाठी पर्वणी, लॉकडाऊन काळातील विविध छटांचे फोटो विक्रीला

श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने वेगवेगळ्या 72 हजार प्रतिमा नव्याने विक्रीसाठी बनवल्या आहेत. (Pandharpur Vitthal Rukmini Mandir Photos)

VIDEO | विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या भाविकांसाठी पर्वणी, लॉकडाऊन काळातील विविध छटांचे फोटो विक्रीला
Pandharpur Vitthal Rukmini Mandir


पंढरपूर : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाची वेगवेगळी रुपे आहेत. दरवर्षी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा सजवला जातो. तसेच विठ्ठल-रुक्मिणीच्या रुपडेही पालटले. याच पार्श्वभूमीवर श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने वेगवेगळ्या 72 हजार प्रतिमा नव्याने विक्रीसाठी बनवल्या आहेत. लवकरच हे फोटो भाविकांना विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. (Pandharpur Vitthal Rukmini Mandir Photos)

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने बनवलेल्या या प्रतिमांमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे विविध रुपांचे फोटो आहेत. हे सर्व फोटो लॉकडाऊन काळातील आहेत.

दरम्यान कोरोनामुळे लॉकडाऊन जरी वाढवला असला तरी भाविकांना या प्रतिमा ऑनलाईनद्वारे मिळणार आहे. यात वेगवेगळ्या आकाराच्या जवळपास 72 हजार प्रतिमा बनवण्यात आल्या आहेत. या सर्व प्रतिमा लवकरच भाविकांसाठी उपलब्ध होणार आहे. यात विठ्ठल रुक्मिणीचे वेगवेगळी रुप पाहायला मिळणार आहेत. हे सर्व फोटो अगदी 100 रुपयांपासून 2 हजार रुपयांपर्यंत असणार आहे.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI