Pankaja Munde | पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड; मोठा अपघात टळला

Pankaja Munde | पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड; मोठा अपघात टळला

| Updated on: Feb 03, 2026 | 12:16 PM

राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे एक मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने हा बिघाड हेलिकॉप्टर उड्डाण घेण्याआधीच लक्षात आल्याने पंकजा मुंडे यांनी आपला प्रवास तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेतला.

राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे एक मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने हा बिघाड हेलिकॉप्टर उड्डाण घेण्याआधीच लक्षात आल्याने पंकजा मुंडे यांनी आपला प्रवास तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार सुरू आहे. त्याच अनुषंगाने मंत्री पंकजा मुंडे या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगरहून लातूरकडे जाणार होत्या. मात्र छत्रपती संभाजीनगर येथून हेलिकॉप्टर उड्डाण घेण्याआधीच तांत्रिक बिघाड असल्याचं दिसून आलं. हेलिकॉप्टरमध्ये नेमका कोणता बिघाड झाला होता, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पंकजा मुंडे यांनी तत्काळ हेलिकॉप्टर प्रवास रद्द करून पर्यायी व्यवस्था स्वीकारल्याचे समजते. या घटनेमुळे काही काळ राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र पंकजा मुंडे सुरक्षित असून कोणतीही इजा झालेली नाही, अशी माहिती समोर आली आहे. निवडणूक प्रचाराच्या धामधुमीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे हेलिकॉप्टरच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Published on: Feb 03, 2026 12:16 PM