Panvel Crime : धक्कादायक! सख्ख्या भावानंच डोक्यात घातला दगडं, भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध, रागाचा पारा चढला अन्…

Panvel Crime : धक्कादायक! सख्ख्या भावानंच डोक्यात घातला दगडं, भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध, रागाचा पारा चढला अन्…

| Updated on: Sep 27, 2025 | 1:00 PM

पनवेलमधील करंजाडे सेक्टर सातमध्ये एका सख्ख्या भावाने आपल्या चुलत भावाची डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. चुलत भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून ही क्रूर घटना घडली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत, पळा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला अवघ्या एका तासाच्या आत अटक केली.

पनवेलमधून एक धक्कादायक आणि गंभीर गुन्हेगारीची बातमी समोर आली आहे. पनवेलच्या करंजाडे सेक्टर सातमध्ये एक सख्ख्या भावाने आपल्या चुलत भावाची निर्घृणपणे हत्या केली आहे. ही घटना परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या चुलत भावाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत, अवघ्या एका तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीने प्राथमिक चौकशीत पोलिसांना कबुली दिली आहे की, त्याने चुलत भावाच्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून ही हत्या केली आहे. या खुनाच्या घटनेने करंजाडे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Published on: Sep 27, 2025 11:25 AM