VIDEO : Sanjay Jadhav | …तर आम्ही पण राष्ट्रवादी काँग्रेसला बुडवू, सेना खासदार संजय जाधवांचा इशारा

| Updated on: Aug 09, 2021 | 12:46 PM

शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव  यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर चांगलीच टिका केली आहे. वेळ आल्यावर माकडीणही आपल्या पिल्लाला पाखाली घालते. आम्हीही राष्ट्रवादीला पायाखाली घालू, असा इशारा संजय जाधव यांनी दिला आहे.

Follow us on

परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीच्या नाट्यावरून शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव  यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचले आहे. वेळ आल्यावर माकडीणही आपल्या पिल्लाला पाखाली घालते. आम्हीही राष्ट्रवादीला पायाखाली घालू, असा इशारा संजय जाधव यांनी दिला आहे. खासदार संजय जाधव यांनी जालन्यात शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना हा इशारा दिला आहे. माकडीण सुध्दा गरज पडल्यावर पिल्लाला बुडवते. आम्ही पण राष्ट्रवादीला बुडवू. मी फक्त आंचल गोयल प्रकरणी शिफारस केली होती. पण राष्ट्रवादीने रान उठवले. तुम्हाला सगळे जमते. आमचे तेवढे उघडे करता. आता पाणी वर जात आहे, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.