केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष अधिवेशन, नेमकी कसली चर्चा?

केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष अधिवेशन, नेमकी कसली चर्चा?

| Updated on: Aug 05, 2026 | 3:41 PM

सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन १३ ओगस्ट रोजी संपणार असल्याचं सांगितलं जात याहे यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे.

सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन १३ ओगस्ट रोजी संपणार असल्याचं सांगितलं जात याहे यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे.   केंद्र सरकारकडून ऑगस्ट 2026 मध्ये संसदेचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यता आहे. अंदाजे 16 ऑगस्टपासून या विशेष अधिवेशनाला सुरुवात होऊ शकते, अशी चर्चा आहे. महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन संबंधित महत्त्वाच्या घटना दुरुस्ती विधेयकांवर या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अन्य काही महत्त्वाच्या विषयांवरही सरकारकडून विशेष अधिवेशनात चर्चा केली जाऊ शकते.

केंद्र सरकार ऑगस्टच्या मध्यात तीन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अधिवेशनाबाबतचा अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयका संबंधित तरतुदींवर या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या घटना दुरुस्ती विधेयकावर संसदेत चर्चा करून मंजुरी घेण्याचा सरकारचा प्रयत्न असू शकतो. डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघांच्या सीमांची नव्याने आखणी करण्याची प्रक्रिया. या विषयाशी संबंधित विधेयकांवरही विशेष अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे.

विशेष अधिवेशन केवळ महिला आरक्षण आणि परिसीमनापुरते मर्यादित राहणार नसल्याची चर्चा आहे. एफसीआरए, वन नेशन वन इलेक्शन अशा इतर महत्त्वाच्या राष्ट्रीय विषयांवरही सरकार आणि विरोधकांमध्ये चर्चा होऊ शकते.

Published on: Aug 05, 2026 3:41 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us