CJP Protest Update | संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले; मुख्य प्रवेशद्वार तातडीने बंद
दिल्लीतील संसद भवन परिसरात सुरू असलेल्या आंदोलनामुळे सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. आंदोलनकर्ते संसद परिसरापर्यंत पोहोचल्याने संसदेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून, संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलनकर्ते विजय चौक परिसरात मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. अभिजित दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शांततेच्या मार्गाने संसद परिसराकडे मोर्चा वळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. आंदोलनाचा वाढता वेग लक्षात घेता संसदेचे मुख्य प्रवेशद्वार तातडीने बंद करण्यात आले असून, सुरक्षा यंत्रणांनी अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांची संख्या सातत्याने वाढत असून, संसद परिसरात मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मोर्चा शांततेत पुढे सरकत असला तरी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिल्ली पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
संसद भवन परिसरातील वाढलेली गर्दी आणि कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे परिसरात तणावपूर्ण पण नियंत्रणातील वातावरण निर्माण झाले असून, परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.