Rajya Sabha Elections 2026 | राज्यसभेसाठी पार्थ पवार मैदानात; महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावाची चर्चा

| Updated on: Mar 04, 2026 | 11:32 AM

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून पार्थ पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून पार्थ पवार अर्ज भरणार असून, यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घोषणा झाल्यानंतर तेही उद्याच अर्ज दाखल करतील, अशी माहिती मिळत आहे.
राज्यसभेच्या उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस जवळ आल्याने राष्ट्रवादीकडून पार्थ पवार आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार हे अर्ज भरणार असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे. त्यामुळे उद्याच्या घडामोडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Mar 04, 2026 11:32 AM
Follow Us