Narayan Rane | भेदरलेला वाघ, राणेंच्या हातात शेपटी; नेटकऱ्यांचा रोख शिवसेनेकडे

| Updated on: Jan 01, 2022 | 2:49 PM

भाजपच्या या यशामुळे आता सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स तसेच फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये नारायण राणे (Narayan Rane) वाघाची शेपटी धरुन त्याला बाहेर खेचत असल्याचा फोटो तर चर्चेचा विषय ठरलाय.

Follow us on

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जिंकत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला चारी मुंड्या चित केलं. भाजपने एकूण 19 जागांपैकी 11 जागा जिंकत महाविकास आघाडीला धूळ चारलीय. या विजयामुळे भाजपला बळ आलं असून शिवसेनेसाठी ही चपराक असल्याचं म्हटलं जातंय. भाजपच्या या यशामुळे आता सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स तसेच फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये नारायण राणे (Narayan Rane) वाघाची शेपटी धरुन त्याला बाहेर खेचत असल्याचा फोटो तर चर्चेचा विषय ठरलाय. हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय.