दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना, जनावरांसाठी 500 एकरांवर चारा लागवड

दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना, जनावरांसाठी 500 एकरांवर चारा लागवड

| Updated on: Nov 09, 2026 | 2:21 PM

पिंपरी चिंचवड महानगरपालिका दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवणार आहे. लष्कराच्या 400 ते 500 एकर मोकळ्या भूखंडावर चारा उगवण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, चार ते पाच महिन्यांत हा चारा उपलब्ध होईल. मुख्यमंत्री महोदयांच्या आवाहनानंतर हा राज्यातील एक पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. महानगरपालिकेने जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील लष्कराच्या 400 ते 500 एकर मोकळ्या भूखंडावर हा चारा उगवला जाईल. या जागेचा सध्या लष्कराकडून वापर केला जात नाही. महापालिकेने लष्कराला विनंती केली आहे की, ही जमीन केवळ चारा उगवण्यासाठी उपलब्ध करून द्यावी. दुष्काळामुळे निर्माण होणाऱ्या चाऱ्याच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

महापालिकेकडे एसटीपीचे प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध असल्याने, जमिनीची मशागत करून तात्काळ चाऱ्याची लागवड केली जाईल. पुढील चार ते पाच महिन्यांत, जेव्हा चाऱ्याची निकड सर्वाधिक भासेल, तेव्हा हा चारा जनावरांसाठी तयार झालेला असेल, असे महापालिका आयुक्तांनी सांगितले. हा राज्यातील एक पथदर्शी प्रकल्प ठरेल.

Published on: Nov 09, 2026 2:21 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us