Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून….
ठाण्यात ठाकरे सेनेचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, तर इतरांचा शोध सुरू आहे. पुर्णेकर कुटुंबीयांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर जुन्या वादातून हत्येचा आरोप केला आहे. सर्व आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला आहे.
ठाण्यात ठाकरे शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणात पाच पैकी दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
पुर्णेकर कुटुंबीयांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर जुन्या वादातून ही हत्या घडवून आणल्याचा गंभीर आरोप केला आहे. या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.
प्रदीप पुर्णेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात आणण्यात आला आहे. मात्र, पुर्णेकर कुटुंबीयांनी सर्व आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. रात्री उशिरा ठाकरे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले होते. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची आणि दोषींना तातडीने अटक करण्याची मागणी कुटुंबीय व पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
