Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?
सुनील तटकरेंचे निकटवर्तीय प्रमोद म्हस्कर यांनी पेण, रोहा, सुधागड विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांचा हवाला देत त्यांनी जिल्हाध्यक्षांना पत्र सादर केले असले तरी, पेण विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा यामागील प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे.
राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सुनील तटकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते प्रमोद म्हस्कर यांनी आपल्याकडील पक्षाच्या विविध अध्यक्षपदांचा राजीनामा दिला आहे. पेण, रोहा आणि सुधागड या तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा त्यांनी त्याग केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हस्कर यांनी जिल्हाध्यक्षांना सादर केलेल्या राजीनामा पत्रात “वैयक्तिक कारणे” देत असल्याचे नमूद केले आहे. मात्र, राजकीय वर्तुळात त्यांच्या राजीनाम्यामागे वेगळीच चर्चा सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत प्रमोद म्हस्कर हे पेण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची जोरदार चर्चा आहे. याच इच्छेतून त्यांनी संघटनात्मक जबाबदाऱ्यांमधून मुक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
या राजीनाम्यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रमोद म्हस्कर यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांचा हा निर्णय आगामी स्थानिक आणि राज्यस्तरीय राजकारणावर काय परिणाम करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
