वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला विठुरायाचा अभंग

वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला विठुरायाचा अभंग

Harshada Shinkar | Updated on: Apr 19, 2024 | 6:09 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व उपस्थितांचं लक्ष वेधून घेतले. मोदी यांनी भारत माता की जय अशी घोषणाबाजी करत आपल्या आजच्या भाषणाची मराठीतून सुरुवात केली. इतंकच नाहीतर त्यांनी पांडुरंगाचेही यावेळी स्मरण केलं. चराचरांत वास करणारी, गुरुदेव शक्ती.....काय म्हणाले मोदी बघा व्हिडीओ

महायुतीचे वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मोदींची आज सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व उपस्थितांचं लक्ष वेधून घेतले. मोदी यांनी भारत माता की जय अशी घोषणाबाजी करत आपल्या आजच्या भाषणाची मराठीतून सुरुवात केली. इतंकच नाहीतर त्यांनी पांडुरंगाचेही यावेळी स्मरण केलं. चराचरांत वास करणारी, गुरुदेव शक्ती या सभेला उपस्थित सर्व बंधू-बघिणींना माझा जयगरु, असं मोदी मराठीत म्हणाले. मोदींनी पांडुरंगाचं स्मरण करताना ‘रुप पाहतां लोचनी’ हा अभंग म्हटला. आज चैत्र एकादशीदेखील आहे. पंढरपूरची आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघी अशा चार यात्रा महत्त्वाच्या असतात. यापैकी आज चैत्र एकादशीची यात्रा…. रुप पाहतां लोचनीं, सुख जालें वो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. अशा पुण्यपर्वकाळात भगवान विठ्ठलांच्या चरणी मी शतश: नमन…. असे मोदी म्हणाले.

Published on: Apr 19, 2024 6:09 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us