गेल्या ५१ दिवसांपासून निर्धार कायम, अंगणवाडी सेवकांनी चौकातच भरवली अंगणवाडी

गेल्या ५१ दिवसांपासून निर्धार कायम, अंगणवाडी सेवकांनी चौकातच भरवली अंगणवाडी

Harshada Shinkar | Updated on: Jan 24, 2024 | 4:17 PM

नागपूरातील अंगणवाडी सेविकांनी आज चक्क संविधान चौकात लहान मुलांसह अंगणवाडी भरवली आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी गेल्या ५१ दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरु आहे

नागपूर, २४ नागपूर २०२४ : गेल्या ५१ दिवसांपासून राज्यातील अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषीत करा, अंगणवाडी सेविकांना वेतनश्रेणी, भविष्यनिर्वाह निधी लागू करा, अंगणवाडी सेविकांना २६ हजार रूपये मानधन देण्याच्या मागणीसह राज्यभरात अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. अशातच नागपूरातील अंगणवाडी सेविकांनी आज चक्क संविधान चौकात लहान मुलांसह अंगणवाडी भरवली आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी गेल्या ५१ दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरु आहे. आज नागपूरातील संविधानात चौकात अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीतील मुलांना घेऊन आंदोलन केलं. २६ हजार रूपये वेतन लागू करा. यासह सोबत ग्रॅज्युटी लागू करा, पेन्शन लागू करा, या  मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे.

Published on: Jan 24, 2024 4:17 PM
Follow Us