पुणे विमानतळावर 8 कोटींचे ड्रग्ज जप्त! बँकॉकहून आलेल्या प्रवाशांवर कारवाई
पुणे विमानतळावर एअर इंटेलिजन्स विभागाने मोठी कारवाई करत 8 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. इंडिगोच्या विमानातून बँकॉकहून आलेल्या प्रवाशांकडून हे ड्रग्ज आणले गेले होते. चार संशयित प्रवाशांच्या चौकशीनंतर ड्रग्जची 16 एअरटाईट पाकिटे सापडली.
पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे विमानतळावर एअर इंटेलिजन्स विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 8 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोच्या एका विमानातून बँकॉक येथून हे ड्रग्ज आणले जात होते.
विमानतळावरील अधिकाऱ्यांनी चार प्रवाशांच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान, प्रवाशांकडून ड्रग्जची 16 एअरटाईट पाकिटे आढळून आली. या घटनेमुळे पुणे विमानतळावर मोठी खळबळ उडाली असून, एअर इंटेलिजन्स विभागाने ड्रग्ज तस्करीचा हा मोठा प्रयत्न हाणून पाडला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Published on: Mar 10, 2026 09:45 AM
Follow Us
