पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60 हून अधिक…
पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड परिसरात महाराष्ट्र ATS ने मोठी कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्या कथित ISI संपर्कांच्या अनुषंगाने ही छापेमारी करण्यात येत आहे. या कारवाईत 60 हून अधिक संशयित व्यक्तींच्या घरांवर एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही तरुणांशी संपर्क साधून त्यांना देशविरोधी कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाल्याचा ATS ला संशय आहे. या प्रकरणात पुरावे गोळा करण्याचे आणि संबंधितांची चौकशी करण्याचे काम सुरू आहे.
यापूर्वीही काही दिवसांपूर्वी राज्यातील विविध भागांमध्ये याच प्रकरणाशी संबंधित कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
तपासादरम्यान काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅप या माध्यमांवरील संपर्क जाळ्याचाही ATS कडून सखोल तपास केला जात आहे.