Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन… नेमकं काय घडलं?
पुण्यात घोरपडी परिसरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत एका 18 वर्षीय हलगी वादकाचा ट्रॉलीखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचे नाव विघ्नेश पवार असे आहे. याशिवाय, लातूरमध्ये विसर्जनावरून दोन गटांत राडा झाला, तर परभणीत गोदावरी नदीत दोन तरुण बुडाले.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान राज्यात अनेक दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. पुण्यातील घोरपडी परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीत हलगी वाजवणारे 18 वर्षीय विघ्नेश पवार यांचा ट्रॉलीखाली येऊन मृत्यू झाला. ही घटना पुणेकरांसाठी धक्कादायक ठरली आहे.
याचबरोबर, लातूरमध्ये गणेश विसर्जनाच्या वादातून दोन गटांमध्ये राडा झाला. पीव्हीआर चौकाजवळ खासगी विहिरीत गणपती विसर्जनावरून हाणामारी झाली, ज्यात एक कार आणि दुचाकीचे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यातही गणेश विसर्जनासाठी गेलेले गजानन घोरपडे आणि मुंबाजी घोरपडे हे दोन तरुण धानोरा काळे शिवारात गोदावरी नदीपात्रात बुडाले. त्यांचा शोधकार्य पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने सुरू आहे.
अन्य घटनांमध्ये, बीड जिल्हा रुग्णालयात मध्यधुंद टोळक्याने राडा घातला, तर नेरळमधील धारप हॉलसमोर विद्युत ट्रान्सफॉर्मरला आग लागली. बारामतीमध्ये वाहतूक पोलिसांनी ब्लॅक फिल्म आणि फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाई करत दंडात्मक कारवाया केल्या.
