Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास…त्यामुळे अशा खुळचट…; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात

Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास…त्यामुळे अशा खुळचट…; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात

| Updated on: Sep 26, 2026 | 6:50 PM

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका ३२ तासांहून अधिक काळ चालल्या. डीजेच्या प्रचंड दणदणाटामुळे पोलीस आयुक्तांनाही हेडफोन वापरावे लागले. विद्यानंद बापट यांनी अशा मिरवणुकांसाठी दिलेल्या परवानग्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली, ‘उत्सवखोरांची मस्ती’ थांबवण्यासाठी परवानग्या बंद करण्याची मागणी केली.

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका यंदा विक्रमी ३२ तासांहून अधिक काळ चालल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विसर्जन मिरवणुकांचा कालावधी वाढला असून, डीजेच्या प्रचंड दणदणाटाने परिसर दुमदुमला होता. डीजेचा आवाज इतका होता की, पुणे पोलीस आयुक्तांनाही अलका चौकात कानात प्रोटेक्शन हेडफोन लावून बसावे लागले.

एका गणेश मंडळाने विद्यानंद बापट यांचा एआय व्हिडिओ स्क्रीनवर दाखवत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर, स्वतः विद्यानंद बापट यांनी मिरवणुकांना दिलेल्या परवानग्यांवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, की परंपरांच्या नावाखाली रहदारीच्या रस्त्यांवर मिरवणुका काढणे आणि खुल्या वातावरणात लाऊडस्पीकर वाजवण्याची परवानगी देणे हास्यास्पद आहे. त्यांनी सतीप्रथा किंवा बालविवाहासारख्या प्रथांशी याची तुलना करत नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे सांगितले. ‘उत्सवखोरांची’ परवानग्यांमुळे आलेली ‘मस्ती’ उतरवण्यासाठी अशा ‘खुळचट’ परवानग्या थांबवणे हाच एकमेव उपाय असल्याचे बापट यांनी ठामपणे नमूद केले.

Published on: Sep 26, 2026 6:50 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us