Pune | कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर चढले!

Pune | कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर चढले!

| Updated on: Jul 30, 2026 | 4:54 PM

पुणे महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनाच्या कथित वादग्रस्त टेंडरप्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे महापालिकेच्या कथित गलथान कारभाराविरोधात शिवसैनिकांनी थेट महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढत जोरदार आंदोलन केले. शिवसेना पुणे शहरप्रमुख नाना भानगिरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान शिवसैनिकांच्या हातात पक्षाचे झेंडे, बॅनर्स आणि निषेध फलक दिसून आले. महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी कचरा व्यवस्थापनातील कथित गैरव्यवहाराचा निषेध केला. आंदोलनामुळे काही काळ महापालिका परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, महापालिका परिसरात दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याही कार्यकर्त्यांनी स्वतंत्र आंदोलन छेडले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून कचरा थेट महापालिकेच्या आवारात फेकत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

शिवसेनेचा आरोप आहे की, कचरा व्यवस्थापनासाठी काढण्यात आलेले टेंडर ‘इमिग्रीन’ कंपनीला देण्याची प्रक्रिया सुरू असून, या निर्णयाला सर्वपक्षीय स्तरावर विरोध होत आहे. हे टेंडर तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

या टेंडरबाबत अनेक राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींनी यापूर्वीही आक्षेप नोंदवले होते. मात्र, प्रशासनाने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याने शिवसेना अधिक आक्रमक झाली असून, आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, या आंदोलनानंतर पुणे महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन धोरणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 30, 2026 4:54 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us