Pune News | तर एकही वाचला नसता… मधमाशांनी हल्ला करताच डेडबॉडी सोडून सर्वच पळाले; व्हिडीओ व्हायरल
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वडगाव पीर येथे अंत्यसंस्कारादरम्यान धक्कादायक घटना घडली. स्मशानभूमीत अंत्यविधी सुरू असतानाच अचानक मधमाशांच्या थव्याने उपस्थितांवर हल्ला चढवला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे स्मशानभूमीत एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू असतानाच मधमाशांनी उपस्थित नातेवाईक आणि नागरिकांना लक्ष्य केले. हल्ल्याची तीव्रता इतकी होती की, अनेकांना मृतदेह जागेवरच सोडून सुरक्षित स्थळी धाव घ्यावी लागली. या प्रकारामुळे काही काळ स्मशानभूमी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेत अनेक जण मधमाशांच्या दंशामुळे जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्मशानभूमीत मृतदेह एकटाच पडलेला दिसत असून, मधमाशांच्या हल्ल्यामुळे उपस्थित नागरिक जीव वाचवण्यासाठी दूरवर पळाल्याचे दृश्य पाहायला मिळते. काही जण मृतदेहाजवळच खाली बसून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहेत.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी स्मशानभूमी परिसरातील सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.