4 तासांची मेहनत, 102 मिठाई अन् लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद; पाहा…

4 तासांची मेहनत, 102 मिठाई अन् लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद; पाहा…

Rachana Bhondave | Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Mar 28, 2023 | 3:54 PM

London Book of World Record : गोष्ट एका वर्ल्ड रेकॉर्डची, 102 मिठाईची आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीची... लंडन बुक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावची नोंद करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या, आमच्या प्रतिनिधी रचना भोंडवे यांच्या रिपोर्टमधून...

पुणे : आपल्या नावावर एखादा वर्ल्ड रेकॉर्ड असावा, अशी आपली सगळ्यांचीच इच्छा असते. त्यासाठी मेहनत घ्यायचीही तयारी असते. पण हा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची कोण-कोणत्या बाबींची पूर्तता करावी लागते? अटी कोणकोणत्या असतात, त्याची प्रक्रिया नेमकी काय असते? ही सगळी प्रक्रिया जाणून घेऊयात… पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापिठातील हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या विद्यार्थ्यांनी लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. 4 तासात 102 भारतीय मिठाई बनविण्याचा विक्रम या विद्यार्थ्यांनी आपल्या नावावर केला आहे. 50 मुलांच्या 4 टीम्स करत या मुलांनी 250 ग्रॅम वजनाची प्रत्येक मिठाई बनवली आणि हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. वर्ल्ड रेकॉर्डची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रचना भोंडवे यांच्या रिपोर्टमधून…

Published on: Mar 28, 2023 3:52 PM
Follow Us